शेतकरी झाला मालामाल; अवघ्या 30गुंठ्यांतून साडेचार लाखांचा मिळाला निव्वळ नफा..! Shetkari

शेतीतून बक्कळ कमाई : 30 गुंठे शेतीत आल्याची लागवड, 14 महिन्यांत साडेचार लाखांचा निव्वळ नफा!

Shetkari पारंपरिक शेतीत अनेकदा अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे शेतकरी कधी-कधी निराश होतात. परंतु, जर पारंपरिक पिकांना फाटा देऊन आधुनिक शेतीची जोड दिली, तर कमी क्षेत्रातही बक्कळ कमाई करता येते. हेच सिद्ध करून दाखवलं आहे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील ओगदी गावातील शेतकरी मनोज गोणटे यांनी.

पारंपरिक शेतीला फाटा, आल्याची निवड

Shetkari मनोज गोणटे यांच्या कुटुंबाची वडिलोपार्जित शेती आहे. ते पूर्वी मका, कांदा, मूग, सोयाबीन यांसारखी पारंपरिक पिके घ्यायचे. मात्र, खर्च जास्त आणि उत्पन्न कमी यामुळे ते नेहमीच चिंतेत असायचे. त्याचवेळी, गावातले काही शेतकरी आल्याची लागवड यशस्वीपणे करत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी लगेच कृषी सल्लागारांना भेटून आल्याच्या शेतीबद्दलची माहिती घेतली आणि या नवीन पिकाची लागवड करायचा निर्णय घेतला.

हे पण वाचा:
SMART Solar Yojana स्मार्ट सोलर योजना ! SMART Solar Yojana

30 गुंठ्यांत ‘माहीम’ आल्याची लागवड

Shetkari गोणटे यांनी गावातील काही शेतकऱ्यांकडून ‘माहीम’ जातीच्या आल्याचे 8 क्विंटल बियाणे विकत घेतले. त्यांनी 36 गुंठे क्षेत्रापैकी 30 गुंठ्यांमध्ये लागवड केली. लागवडीसाठी त्यांनी शेणखत, बेसल डोस आणि जैविक औषधांचा वापर केला. पिकाला ठिबक सिंचनाने पाणी दिले. यासाठी त्यांना एकूण साडेचार लाख रुपये खर्च आला.

संयम ठेवला, चांगला भाव मिळाला

14 महिन्यांनंतर आल्याचे पीक काढणीला आले. सुरुवातीला बाजारभाव कमी झाल्याने ते चिंतेत होते. परंतु, त्यांनी संयम ठेवला आणि भाव वाढण्याची वाट पाहिली. काही दिवसांनी अचानक बाजारभाव वाढला. गोणटे यांनी लगेच 280 क्विंटल आलं देवगाव रंगारी येथील व्यापारी गोरख रावते यांना 40 रुपये प्रति किलो दराने विकले. यातून त्यांना 9 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. लागलेला खर्च वजा जाता त्यांना 14 महिन्यांत तब्बल साडेचार लाखांचा निव्वळ नफा झाला.

कमी क्षेत्रात आल्याची लागवड करून उच्चांकी नफा मिळवल्यामुळे मनोज गोणटे यांचं नाव केवळ गावातच नव्हे, तर संपूर्ण तालुक्यात गाजलं आहे. योग्य नियोजन आणि कठोर परिश्रम घेतल्यास कमी क्षेत्रातूनही मोठे उत्पन्न मिळवता येते, हे त्यांनी दाखवून दिले आहे.

हे पण वाचा:
Monsoon Withdrawal राज्यात मान्सून परतला ,पावसाचे या तारखेपासून पुनरागमन होणार ? Monsoon Withdrawal

Leave a Comment